क्राइम ब्लास्ट ब्यूरो
युवक-युवतींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणार्या शिरपूर शहरातील सुदर्शन लॉज येथे पोलिसांनी छापा टाकला खरा, पण पोलिसांची चाहूल लागताच संबंधित तोतामैना फरार झाले. लॉजमालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लॉजमधून फरार झालेल्यांमध्ये कोणाचा समावेश आहे याबाबत खमंग चर्चा रंगली आहे.
शहरातील मेनरोडच्या मागील बाजूस असलेल्या सुदर्शन लॉजमध्ये अश्लील चाळे सुरु असल्याबाबत परिसरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर 28 जानेवारीला शहर पोलिसांनी छापा टाकला. पीआय ए.एस.आगरकर, हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, मनोज पाटील, महिला पोलिस पौर्णिमा पाटील, अनिता पावरा, प्रवीण गोसावी, अमित रनमळे, गोविंद कोळी, मुकेश पावरा, सचिन वाघ आदिंनी लॉजमध्ये शिरुन पाहणी केली. मात्र पोलिसांना पाहून युवक युवती पळून गेल्याचे आढळले.
पोलिसांनी लॉजच्या खोल्यांची पाहणी केली असता तेथील गाद्या, बेडशीट, उशी आदि अस्ताव्यस्त अवस्थेत आढळल्या. लॉजच्या काऊंटरवर असलेल्या दर्शन दशरथ पाटील (वय 23, रा.महेशनगर, शिरपूर) याच्याकडे विचारणा केली असता पळून गेलेल्या युवकयुवतींची कोणतीच नोंद नसल्याचे दिसून आले. तसेच त्यांचे ओळखपत्रही त्याने घेतले नव्हते. लॉजमालकाविरोधात हवालदार स्वप्नील बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.