हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

हेमंत देशमुखांवर सव्वा कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

राज्याचे माजी कामगार मंत्री डॉ.हेमंत देशमुख यांच्यासह सहा जणांविरोधात सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या संशयावरुन दोंडाइचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी जमीन विक्रीचा करार करुन पैसे घेतल्यानंतरही दुसर्‍याला परस्पर विक्री केल्याचा संशय आहे. संशयितांमध्ये डॉ.देशमुख यांच्या भावाचाही समावेश आहे.
नंदुरबार येथील रहिवाशी शेख फारूक शेख नजीर यांनी दोंडाइचा पोलिस ठाण्यात दहा जानेवारीला याबाबतचा तक्रारी अर्ज दिला होता. त्याची चौकशी करुन पोलिस अधीक्षकांनी परवानगी दिल्यानंतर 23 जानेवारीला हा गुन्हा दाखल करण्यात आला.

दोंडाइचा शहरातील सर्व्हे नं.56/1 मधील 16 हजार स्क्वेअर मीटर जमीन मालक हेमंत भास्कर देशमुख, राजेंद्र विष्णू इंगळे, अंबादास कन्हय्यालाल मराठे, बापूसाहेब रवींद्र देशमुख यांनी 2022 मध्ये फारुख शेख यांना विकण्याचे कबूल करुन खरेदी खत तयार करुन देण्याची तयारी दर्शवली. त्यांचा विश्वास संपादन करुन फारुख शेख यांच्याकडून रोख 16 लाख रुपये व एक कोटी चार लाख रुपये बँक खात्याद्वारे घेतले. मात्र प्रत्यक्षात या जमिनीची विक्री त्यांनी दोंडाइचा येथील अनिल चंपालाल पारख व गणेश भुरमल बंब यांना केली. तसा व्यवहार करतांना राजेंद्र इंगळे हा संपूर्ण खरेदी खतातील संमतीदार आहे असे दर्शवले. एक कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली संशयित हेमंत देशमुख, राजेंद्र इंगळे, अंबादास मराठे, बापूसाहेब देशमुख, अनिल पारख व गणेशमल बंब यांच्याविरोधात दोंडाइचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!