हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मोर्चा तर निघणारच !

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वैयक्तिक व सामूहिक वनहक्क दाव्यासंबंधात नियोजित मोर्चा आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र आचारसंहितेनंतर मोर्चा निघणारच असे आमदार काशीराम पावरा यांनी स्पष्ट केले.

 

जिल्हास्तरीय प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे तब्बल पाच हजार 780 वनदावे अमान्य केले आहेत. दावे नामंजूर केल्याची कारणेदेखील अत्यंत त्रोटक आहेत. प्रत्यक्ष स्थळाची पाहणी न करताच एकतर्फी निर्णय देऊन आदिवासींवर अन्याय झाला आहे. याविरोधात 10 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र देऊन मोर्चा काढण्याचा इशारा आमदार काशीराम पावरा यांनी दिला होता. मात्र नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याने आचारसंहितेच्या कारणास्तव मोर्चा काढता येणार नाही असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले. त्यामुळे आचारसंहिता कालावधी संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असे आ.पावरा यांनी सांगितले. तसेच आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत वनविभागाकडे पुरेसा कालावधी आहे, त्याचा उपयोग करुन त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी अपेक्षाही आ.पावरा यांनी व्यक्त केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!