क्राईम ब्लास्ट ब्यूरो

पेट्रोल पंपाच्या नोझल मशीनचे स्टॅम्पिंग करुन देण्याच्या मोबदल्यात सहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना वजनमापे निरीक्षक विवेक सोनू झरेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
22 नोव्हेंबरला पहूर ते जळगाव रस्त्यावर अजिंक्य हॉटेलमध्ये सहा हजार रुपयांची लाच घेतांना झरेकरला आपल्यासाठी रचलेल्या सापळ्याची कोणतीच खबर नव्हती. लाच स्विकारताच जळगाव एसीबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.
तक्रारदाराचा पहूर येथे पेट्रोल पंप आहे. तेथे चार नोझल मशीन आहेत. त्यांचे स्टॅम्पिंग केल्यानंतर स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात शासकीय फी व्यतिरिक्त प्रत्येकी दीड हजार रुपये याप्रमाणे एकूण सहा हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी पाचोरा येथील वैध मापनशास्त्र विभागाचा निरीक्षक विवेक झरेकर याने केली. त्याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार करण्यात आली. लाच स्विकारतांना संशयिताला रंगेहाथ पकडण्यात आले.