क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शहर आणि परिसरात मोटारसायकली चोरुन धुमाकूळ घालणार्या टारझनसह त्याच्या साथीदाराला एलसीबीने अटक केली. संशयितांकडून चोरीच्या तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.
संशयित लखन उर्फे टारझन सुरेश बारेला (वय 22, रा.अजागिर्या ता.वरला, मध्यप्रदेश) व त्याचा साथीदार गणेश उर्फ धनशा शिलदार बारेला (वय 24, रा.कर्जाना ता.चोपडा) हे मोटारसायकल चोरुन विकत असल्याची माहिती जळगाव एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह दोघांचा शोध सुरु केला. संशयित गणेश कर्जाना गावात वावरत असल्याची माहिती मिळाल्याने एलसीबी पथक तेथे गेले. रस्त्यात त्यांना दोन्ही संशयित मोटारसायकलवर बसून येतांना आढळले. पोलिसांनी त्यांना हटकले असता मोटारसायकलच्या मालकीबाबत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशयितांना अटक करुन पोलिस ठाण्यात आणले असता त्यांनी अट्टल मोटारसायकल चोर गणेश बारेला याच्यासोबत नाशिक व चोपडा येथून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक एम.रामकुमार यांनी एलसीबीचे अभिनंदन केले.