हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अतिक्रमणाबाबत आमदारांची ही आहे भूमिका !

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदरच आहे. पण गायरान जमिनीवर संसार थाटलेल्या हजारो लोकांच्या भावनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न सोडवितांना प्रशासनाने अतिक्रमणधारकांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन मार्ग काढावा अशी मागणी आमदार काशीराम पावरा यांनी प्रशासनाकडे केली.

तालुक्यातील सात गावांमधील गायरान जमिनीवर राहणार्‍या 1200 कुटुंबांना अतिक्रमणात असल्याने घरे काढून घ्यावीत अशा नोटीसा जिल्हाधिकार्‍यांनी बजावल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर अतिक्रमणधारकांना दिलासा द्यावा यासाठी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, प्रियदर्शनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील व अन्य लोकप्रतिनिधींनी 21 नोव्हेंबरला प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांना निवेदन दिले. निवेदन देतेवेळी आ.पावरा, देवेंद्र पाटील यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांत पाटील, यतीश सोनवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर माळी, मांडळचे ज्येष्ठ नेते भटू माळी, सुनिल सोनवणे, ताजपुरीचे सरपंच हेमंत सनेर, अजंदेचे सरपंच राजेंद्र पाटील, कळमसरे येथील रवींद्र राजपूत, बलकुवे येथील प्रदीप चव्हाण, मांडळच्या उपसरपंच अक्काबाई भिल, छगन माळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!