हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

दोन युवकांकडून चार पिस्तुले जप्त

एलसीबीची कारवाई

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

अवैध शस्त्र निर्मितीसाठी कुख्यात असलेल्या उमरठी येथून गावठी पिस्तूल खरेदी करून परत जाणाऱ्या दोन युवकांना एलसीबी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली.

 

चोपडा शहरातील शिवाजी चौकात 13 नोव्हेंबरला रात्री अकराला सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. ह्युंदाई कार (एमएच 15, डीएम 7778) मधील युवकांना बाहेर काढून झडती घेतली असता त्यांच्याकडे चार गावठी पिस्तुले व दहा जिवंत काडतुसे सापडली. राजेंद्र ऊर्फ पप्पू भिमा चव्हाण (वय ३२, मूळ रा. खंडाळा ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर ह.मु.श्रीरामपूर जि. अहमदनगर) व गणेश ज्ञानेश्वर सातपुते (वय २३, रा. शिरसगाव ता. श्रीरामपुर जि. अहमदनगर) अशी संशयितांची नावे आहेत. राजेंद्र चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून अहमदनगर जिल्ह्यात त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

 

पोलिस अधीक्षक  एम. राज कुमार, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी व  रमेश चोपडे, सहायक पोलिस अधीक्षक ऋषिकेश राऊ यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एलसीबीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  किसन नजनपाटील व सहकाऱ्यांनी  ही कारवाई केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!