क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर तालुक्यातील चिलारे गावाच्या शिवारात कपाशीच्या पिकाच्या आडून सुरू असलेली गांजाची शेती सांगवी पोलिसांनी उध्वस्त केली. 12 नोव्हेंबरला दुपारी केलेल्या या कारवाईत दोन लाख रुपये किंमतीचा 63 किलो गांजा जप्त करून संशयिताला अटक करण्यात आली.
तालुक्यातील चिलारे गावांतर्गत टिटवापाणी या आदिवासी पाड्यातील शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाल्याने तालुका पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाट व पोलिसांनी छापा टाकला. 37 किलो वजनाची गांजाची झाडे आणि वाळवलेला 26 किलो गांजा असा एकूण 63 किलो गांजा या कारवाईत जप्त करण्यात आला. त्याची एकूण किंमत दोन लाख आठ हजार रुपये आहे. संशयित हिरालाल व्यंकट पावरा (52, रा.टिटवापाणी) याला अटक करण्यात आली.
पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि सुरेश शिरसाठ, पीएसआय भिकाजी पाटील, पीएसआय संदीप पाटील, हवालदार संजय सूर्यवंशी, संदीप ठाकरे, परशुराम पवार, मुकेश पावरा, कृष्णा पावरा, संजय भोई, योगेश मोरे, सईद शेख, रोहिदास पावरा यांनी ही कारवाई केली.