क्राईम ब्लास्ट ब्यूरो

कपाशी वेचणार्या मजुरांना शिरपूरकडे घेऊन येणारा पिकअप उलटून झालेल्या अपघातात सुमारे 15 जण जखमी झाले. हा अपघात दहा नोव्हेंबरला सायंकाळी महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर घडला. गंभीर जखमींना धुळे येथे पाठवण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील आमोदे येथे आदिवासी वस्तीत राहणारे मजूर कपाशी वेचण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथे गेले होते. ते सायंकाळी परत येत असतांना पिकअपचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून वाहन उलटले. या अपघातात इतर मजुरांच्या वजनाखाली दाबले जाऊन व रस्त्यावर आदळल्याने 15 जण जखमी झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना धुळे येथे रवाना करण्यात आले.
जखमींची नावे अशी,
दिव्या गोपाल भिल (15), नंदिनी भावसिंग जाधव (15), प्रीती गजेंद्र भिल (9), निलेश नाना भिल (10), काजल देविदास कोळी (16), सोनाली कैलास भिल (25), राजनंदिनी रवींद्र भिल (14), सरिता गोपाल भिल (15), रोहन प्रविण भिल (पाच वर्षे), विकास संजय पवार (15), मंदाबाई कृष्णा भिल (25), राज कृष्णा भिल (10), सूरज पिंटू भिल (10), धनसिंग सीताराम भिल (55), तापीबाई सायसिंग भिल (70), शांताबाई बारकू कोळी (70).