क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य निवडून देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम नऊ नोव्हेंबरला जाहीर केला.
या ग्रामपंचायतींमध्ये खंबाळे, वाघाडी, करवंद, वरझडी, मांजरोद, अर्थे खुर्द, अर्थे बुद्रुक, अजंदे बुद्रुक, हाडाखेड, बोराडी, थाळनेर, अजनाड, महादेव दोंदवाडे, तऱ्हाडकसबे, खर्दे पाथर्डे, तोंदे, हिसाळे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तेथील सरपंच थेट जनतेतून निवडून द्यावयाचे असल्यामुळे चुरस वाढणार आहे.
निवडणूक कार्यक्रम असा,
अर्ज भरणे 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
छाननी 5 डिसेंबर
अर्ज माघारी मुदत 7 डिसेंबर
मतदान 18 डिसेंबर
मतमोजणी 20 डिसेंबर