हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

भांडी चोरणाऱ्यांना अटक

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

वृद्ध महिलेकडे घरफोडी करून तांब्यापितळेची भांडी आणि टीव्ही चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलिसांच्या डीबी पथकाने शिताफीने अटक केली.

शहरातील किस्मत नगर येथील मीराबाई दिलीप कोळी यांच्या घराचे कुलूप तोडून तांब्यापितळेची भांडी आणि टीव्ही असा 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. मीराबाई बाहेरगावी गेल्याची संधी साधून 24 ते 29 ऑक्टोबरदरम्यान ही घरफोडी करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास करतांना पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख व डीबी पथकाला संशयित कमलेश तथा पप्पू शालिक माळी व राहुल रतीलाल सुतार (दोघे रा.किस्मत नगर) यांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनी चोरीची कबुली देऊन चोरलेला मुद्देमाल काढून दिला. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड, डीबी पथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, गोविंद कोळी, विनोद आखडमल, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, होमगार्ड मिथून पवार, चेतन भावसार, शरद पारधी व नाना अहिरे यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!