हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक
वीज कंपनीचे लाचखोर गजाआड
क्राईम ब्लास्ट ब्यूरो

वाईन शॉपला विद्युत पुरवठा करण्यासाठी दहा हजार रुपये घेतांना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या लाइनमनला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन नोव्हेंबरला सायंकाळी रंगेहाथ पकडले. त्याने कनिष्ठ अभियंत्याच्या सांगण्यावरुन पैसे स्विकारल्याचा संशय असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एसीबीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील तक्रारदाराचे शिरपूर तालुक्यातील खंबाळे गावात बिअर आणि वाईन शॉप आहे. तेथे कमर्शिअल पॉवर सप्लाय घ्यावयाचा होता. त्यामुळे त्यांनी वीज कंपनीकडे ऑनलाइन अर्ज केला. तालुक्यातील वीज कंपनीच्या सुळे येथील कक्षात जाऊन त्यांनी अभियंता समाधान सुधाकर पाटील याच्याकडे ऑनलाइन अर्जाची प्रतीसह अन्य कागदपत्रे दिली. त्या कामासाठी लाइनमन निलेश माळी याला भेटा असे पाटील याने सांगितले. निलेश माळी याने खंबाळे दुकानावर जाऊन तक्रारदाराची भेट घेतली. डिमांड नोट  काढण्यासाठी त्याने दहा हजार रुपयांची मागणी केली. तसेच ही मागणी समाधान पाटील यांच्या सांगण्यावरुन केल्याचे सांगितले. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तीन नोव्हेंबरला विभागाच्या पथकाने सापळा रचून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर दहा हजार रुपयांची लाच स्विकारतांना निलेश माळी याला रंगेहाथ पकडले. कनिष्ठ अभियंता समाधान पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार, धुळे येथील उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजीतसिंह चव्हाण, हवालदार राजन कदम, शरद कटके, संतोष पावरा, गायत्री पाटील, संदीप कदम, रामदास बारेला, प्रशांत बागूल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली. 
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!