हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

लाचखोर पोलिस अधिकार्‍यांना अटक

क्राइम ब्लास्ट ब्यूरो


बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून समावेश करणे टाळण्यासाठी 15 हजार रुपयांची लाचेची मागणी करणार्‍या दोन पोलिस अधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

लाच मागितली गेल्याने व्यथित झालेल्या व्यक्तिने याबाबत तक्रार केली होती. त्यांच्या मुलावर जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलिस ठाण्यात अपहरण, बलात्कार व अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला 27 ऑगस्टला अटक करण्यात आली होती. तक्रारदार आपल्या मुलास भेटण्यासाठी गेले असता गुन्ह्याचे चौकशी अधिकारी पीएसआय  समाधान गायकवाड याने त्यांना सांगितले की, तुमचा मुलगा अपहृत मुलीस घेऊन ज्यांच्या घरी थांबला होता, त्यात तुम्ही स्वत:, तुमची पत्नी, भाऊ व तुमची बहीण यांना आरोपी केले जाईल. ते टाळायचे असेल तर 60 हजार रुपये द्या. तडजोडीअंती ही रक्कम 15 हजार रुपये ठरली. पंचासमक्ष लाचेची रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केल्याने व त्यास सहायक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले यांनी प्रोत्साहन दिल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर अधीक्षक एन.एस.न्याहळदे, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहायक निरीक्षक दिनेशसिंह पाटील, पोलिस नाईक बाळू मराठे, ईश्वर धनगर, शिपाई राकेश दुसाने यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!