हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

महिला अध्यक्षांना कोणी फसवले ?

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

प्लॉट खरेदी करुन देण्याच्या बहाण्याने महिला जिल्हाध्यक्षांची फसवणूक केल्याच्या संशयावरुन सटाणा तालुक्यातील लखमापूर येथील एकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

 

नेर (जि.धुळे) येथील माजी जिल्हा परिषद सदस्या तथा महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा गायत्रीदेवी संजय जयस्वाल यांची फसवणूक केल्याचे हे प्रकरण आहे. संशयित प्रफुल्ल माधवराव पगार (रा.लखमापूर) याने 2019 मध्ये त्यांच्याशी संपर्क साधला होता. धुळे येथील प्लॉट नं.562/ब पैकी प्लॉट नं.चारचे 4800 स्क्वेअर फूट क्षेत्र 30 लाख रुपयांत खरेदी करुन देण्याचे आमिष त्याने दाखवले. 28 फेब्रुवारी 2019 रोजी श्रीमती जयस्वाल यांनी नेर येथे राहत्या घरी त्याला 13 लाख रुपये चेकने दिले. उर्वरित 17 लाख रुपये रोखीने देण्यात आले. मात्र पैसे स्विकारल्यानंतरही आजपावेतो संशयित पगार याने खरेदी करुन दिली नाही किंवा पैसेही परत केले नाही. श्रीमती जयस्वाल यांची फसवणूक करुन विश्वासघात केल्याप्रकरणी संशयिताविरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक सागर काळे तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!