क्राईम ब्लास्ट ब्यूरो
हायवेवर पिस्तूल घेऊन फिरणार्या एकाला पोलिसांनी पालवी हॉटेलसमोर अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल, काडतुसे मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचा साथीदार फरार असून शोध सुरु आहे.
17 ऑक्टोबरला सायंकाळी सव्वापाचला ही कारवाई करण्यात आली. समीर गफ्फार शेख (24, रा.अंबिका नगर, शिरपूर) याला घटनास्थळीच पकडण्यात आले तर त्याचा साथीदार भुर्या उर्फ हसनेन शेख (रा.कुंभारटेक, शिरपूर) हा फरार झाला. समीरकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व एचएच 14, जीझेड 1117 क्रमांकाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल असा 70 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिरपूरचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी बजावली.