हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

कर्मचारी महिलेकडे शरीर सुखाची मागणी, दोघांवर गुन्हा

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अधिकारी आणि क्राईम रिपोर्टर असल्याचा बनाव करून कंत्राटी कर्मचारी महिलेकडून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

महिलेस धमकी देऊन आधी 45 हजार रुपयांची खंडणी संशयितांनी वसूल केली होती. त्यानंतर त्यांची नजर तिच्या शरीराकडे वळली. संभाव्य शोषणाचा धोका ओळखून तिने पोलिसांत धाव घेतली.

संबंधित महिला जिल्हा परिषदेची कंत्राटी कर्मचारी आहे. एका पंचायत समितीमध्ये कार्यरत असतांना सात ते 15 ऑक्टोबरदरम्यान संशयित महेंद्र सोनवणे व राजेंद्र निकम यांच्यासह एकाने तिच्या कर्तव्याच्या जागी जाऊन तिच्या हातात एक हजार रुपये दिले. या घटनेचे व्हिडीओ शूटिंग त्यांनी केले. सोनवणे याने आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले तर निकम याने आपण क्राईम रिपोर्टर असल्याचा बनाव केला. कारवाई आणि बदनामीची भीती दाखवून त्यांनी महिलेकडून 45 हजार रुपयांची खंडणी उकळली. त्यानंतर तिच्याशी अंगलट करून विनयभंग करीत शरीर सुखाची मागणी केली. त्यामुळे महिलेने जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!