हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अश्लील व्हिडीओ क्लिपप्रकरणी 10 जणांवर गुन्हा

चाईल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणार्‍या अकाऊंटला धक्का
क्राईम ब्लास्ट ब्यूरो
लहान मुली-मुलांवरील शारीरिक अत्याचाराचे व्हिडीओ चित्रण करुन त्याच्या क्लिप्स प्रसारित करणार्‍या दहा अकाऊंटवर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व अकाऊंट कोणाचे आहेत, ते कोण ऑपरेट करतो याचा शोध सुरु आहे.

फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप आणि इन्स्टाग्राम या सामाजिक माध्यमांवर हा प्रकार घडल्याचे सायबर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस शिपाई सचिन सोनवणे यांनी त्याबाबत फिर्याद दिली. चाईल्ड पोर्नोग्राफी या निषिद्ध प्रकारात समावेश होणार्‍या व्हिडीओ क्लिप्स प्रसारित केल्याप्रकरणी दहा अकाऊंटविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 

 
या अकाऊंटमध्ये संशयित 1) आकाश माळी 2) vishal.bari.9883 3) hena.sihkh 4)raj.chavhan.5473894 5) 917892966266 6)abhiram_nair_ 7) Ajay kumar 8) vishal.sonawane._ 9) manik.bil.3 10) Shobha असे यूजरनेम असलेल्यांचा समावेश असून जळगाव येथील सायबर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक लिलाधर कानडे तपास करीत आहेत. 
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!