क्राईम ब्लास्ट ब्यूरो
येथील आयु.विजयानंद शिरसाठ यांच्या निवासस्थानी अश्विन पौर्णिमा साजरी करण्यात आली.

भारतीय बौद्धमहासभेचे तालुकाध्यक्ष अशोक लहू ढिवरे अध्यक्षस्थानी होते. सदानंद शिरसाठ व विजयानंद शिरसाठ यांनी सपत्नीक व अशोक ढिवरे , कोशाध्यक्ष मंगळे रावसाहेब यांच्याहस्ते भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्रिसरण, पंचशील, बुद्ध, धम्म, संघ पूजा आशीर्वाद गाथा म्हणण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस बौद्धाचार्य प्रबुद्ध शिरसाठ यांनी विधिसंचलन केले. पी.वाय.शिरसाठ यांनी प्रास्तविक केले. बी.व्ही.मोरे यांनी अनुमोदन दिले. उपस्थितांचा सत्कार विजयानंद शिरसाठ व त्यांच्या धम्मपत्नी यांनी केला. डोंगरे सर यांनी भीमगीत सादर केले. पी.वाय.शिरसाठ यांनी अश्विन पौर्णिमेचे महत्त्व व माहिती सांगितली गौतम महिरे यांनी भगवान बुद्ध यांनी सांगितलेला प्रत्युत्य समुदाय तसेच विनयपिटक या विषयावर माहिती दिली. ढिवरे यांनी मनोगत व्यक्त केले. शिरपूर शाखेचे सचिव मिलिंद शिरसाठ यांनी आभार मानले. 19 ते 28 ऑक्टोबर दरम्यान धुळे येथे होणाऱ्या श्रामनेर शिबिरासाठी निधी संकलन करण्यात आले.