हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिंदे गटाच्या मेळाव्याला शिरपूरचे कोण गेले ?

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

दसऱ्यानिमित्त मुंबई येथे बीकेसी मैदानावर आज (दि.5) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा होत आहे. त्याला उपस्थित राहण्यासाठी शिरपूर शहर आणि तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे गटाने तालुक्यात इतक्या खोलवर शिरकाव कधी केला याच्या विचाराने अन्य राजकीय पक्ष बुचकळ्यात पडले असून आगामी काळात राजकारणातील उलथापालथ वाढण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

शिरपूर तालुक्यातील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भरलेल्या तब्बल 14 बसेस मुंबईकडे रवाना झाल्याचे कळते. प्रत्येकी 40 कार्यकर्ते जमेस धरले तरी शिरपूरचे सुमारे साडेपाचशे कार्यकर्ते बीकेसी मैदानावर हजर राहतील हे स्पष्ट आहे. शिवसेनेत दुफळी झाल्यानंतर जाहीररीत्या अद्याप कोणीही शक्तिप्रदर्शन केलेले नाही. मात्र शिंदे गटात गेलेल्या शिरपूरच्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ स्तरावरुन चांगलेच बळ पुरवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्याचा परिणाम प्रथमच दसरा मेळाव्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना होण्यात झाल्याचे स्पष्ट आहे.

साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित, महानगरप्रमुख सतीश महाले, मनोज मोरे, संजय गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यात शिंदे गटात कार्यरत दीपक जमादार, मनोज धनगर, संजय पाटील, कन्हैया चौधरी, बंटी लांडगे, डॉ. गणेश वाडीले, भैय्या कोळी, सुनील पावरा, मनोज साळुंखे, मनसाराम पावरा, भागीरथ पावरा, तुषार महाले, राजेंद्र शिंपी, विकास महिरराव, नंदू  महाराज, जितू  राजपूत, जितु  कलाल, हर्षल चौधरी, मिलिंद धनगर आदींनी मुंबई दौऱ्याचे संयोजन केले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!