क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूरचे माहेर असलेल्या कविता चौधरीचा सासरच्या लोकांनी गळा दाबून खून केला असून त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी खान्देश तेली समाज मंडळाने केली आहे.
मंडळातर्फे दिलेल्या निवेदनानुसार, शिरपूर येथील रहिवासी गणेश चौधरी यांची मुलगी कविता हिचा विवाह चाळीसगाव येथील स्नेहदीप क्लासेसचा संचालक गोकुळ उत्तम चौधरी याच्याशी झाला होता. लग्नानंतर तिचा छळ सुरू झाला. सासू, सासरा आणि पतीकडून तिला प्रचंड यातना दिल्या जात होत्या. ती छळाला तोंड देत होती. अखेर सासरच्या लोकांनी तिचा गळा दाबून खून केला. प्रारंभी त्यांनी कविताने गळफास घेतल्याचा बनाव केला. मात्र नंतर खरा प्रकार उघड झाला असून सासरा उत्तम पुंजाजी चौधरी, सासू अलका उत्तम चौधरी व पती गोकुळ चौधरी यांना अटक करण्यात आली. मृत कविताला अडीच वर्षाचा मुलगा आणि तीन महिन्याची मुलगी आहे. या घटनेमुळे सर्व तेली समाजात संतापाची लाट पसरली असून पोलिसांनी योग्य साक्षीपुरावे गोळा करून संशयितांना अधिकाधिक कठोर शिक्षा होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत अशी मागणी संघटनेने केली आहे..