क्राईम ब्लास्ट ब्यूरो
अल्पवयीन मुलीला उचलून घरात नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील टेकवाडे गावात घडली.
मुलीने पळ काढल्यानंतर तिच्या पाठोपाठ चाकू घेऊन पडणाऱ्या नराधमाने तिच्या दोन भावंडांनाही जखमी केले. त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत 14 वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 28 सप्टेंबरला रात्री तीन वाजेच्या सुमारास ती आईसोबत घराबाहेर पत्राच्या शेडमध्ये झोपली असताना तिच्या शेजारी राहणारा संशयित राकेश संजय कोळी याने तिच्या तोंडावर रुमाल दाबून तिला स्वतःच्या घरात उचलून नेले. पलंगावर झोपवून तिच्या गळ्याला चाकू लावला. मी तुझ्याशी लग्न करेल, आरोळ्या मारू नको नाहीतर आताच तुला मारून टाकून तुझं प्रेत फेकून देईल अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे गलितगात्र झालेल्या मुलीवर त्याने अत्याचार केला.
दोनदा बलात्कार केल्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा बलात्काराच्या तयारीत असताना तिने त्याच्या हातातील चाकू फेकून दिला व घराकडे पळ काढला. घराजवळ येऊन ती आईला बिलगली. दरम्यान राकेश कोळी देखील हातात चाकू घेऊन तिच्या मागे पळत आला. पीडितेचा भाऊ व चुलत भावाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याने दोघांवर चाकूचे वार करून त्यांना जखमी करून पळ काढला. या घटनेनंतर जाग आलेल्या गावकऱ्यांनी गावात संशयिताचा शोध घेतला. मात्र तो आढळला नाही. अखेर कुटुंबासह पीडित मुलीने शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून संशयित आरोपी राकेश संजय कोळी याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.