हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

काय म्हणाले एसपी ?

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका चित्रफितीने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या टोळीबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, ही केवळ एक अफवाच असून, अशा प्रकारची घटना धुळे किंवा शेजारच्या जिल्ह्यात कुठेही घडलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक प्रविणकुमार पाटील  यांनी केले आहे.

22 सप्टेंबरला एसपी पाटील यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जिल्ह्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरविली जात आहे. मात्र, अशा प्रकारची कोणतीही टोळी जिल्ह्यात कार्यरत नाही.  अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. लहान मुलांना पळवून नेण्याची घटना धुळे जिल्ह्यात किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यात कोठेही घडली नसल्याची माहितीही त्यांनी दिली. न्यायालयाच्या आदेशानुसार 18 वर्षाआतील मुले-मुली बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी डीवायएसपी दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख उपस्थित होते.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!