हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

दत्तू-गुंट्याकडून 15 मोटरसायकल जप्त

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी बजावत दोन चोरट्यांकडून आठ लाख 30 हजार रुपये किमतीच्या 15 मोटरसायकल जप्त केल्या. चोरट्यांनी शिरपूरसह जळगाव जिल्ह्यातून या मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी शिरपूरला येऊन शहर पोलिसांची पाठ थोपटली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 सप्टेंबरला दुपारी सांगवी गावातून शिरपूरला आलेल्या किशोर शिवदास भिल यांची हिरो कंपनीची एचएफ डीलक्स मोटरसायकल अज्ञात संशयितांनी चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना चोरटे करवंद नाका परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली. शोध पथकाने संशयित चुनिलाल उर्फ गणेश उर्फ गुंट्या भोल्या पावरा (वय 20, रा. बोरमळी ता.चोपडा जि. जळगाव) व दत्तू उर्फ दीपक कुमार पावरा (वय 23 रा. बोरमळीपाडा ता.शिरपूर) यांना अटक केली.

त्यांच्याकडून माहिती घेत असताना एकापाठोपाठ 15 मोटरसायकल चोरल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवून 15 मोटरसायकल जप्त केल्या. 22 सप्टेंबरला एसपी प्रवीणकुमार पाटील यांनी शिरपूरला भेट देऊन या कामगिरीबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे हवालदार ललित पाटील, गोविंद कोळी, विनोद अखडमल, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा, प्रशांत पवार, होमगार्ड मिथुन पवार, चेतन भावसार, राम भिल, शरद पारधी यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!