हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

व्याजासाठी व्यापाऱ्याचे अपहरण

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

व्याजाचे पैसे थकीत असल्याचा बहाणा करून सोने-चांदीच्या व्यापाऱ्याला पळून नेत त्याची स्कुटी, कार व दागिने हिसकावून बेदम मारहाण केल्याची खळबळ जनक घटना तळोदा शहरात घडली. व्यापाऱ्याने स्वतःची शिताफिने सुटका करून घेत पोलीस ठाणे गाठले. एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जितेंद्र पूनमचंद सोनी (वय 42, रा.लक्ष्मी नगर, नंदुरबार) असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचा सोनेचांदीचा व्यवसाय आहे. त्यांना आपण व्याजाने पैसे दिले होते, व्याज थकले आहे असा बहाणा करून आठ सप्टेंबरला संशयितांनी त्यांना नंदुरबार शहरातील सी.बी.पेट्रोल पंप येथून वाहनात डांबून नेले. तळोदा येथील संजय हॉटेल व हॉटेलपासून काही अंतरावर असलेल्या स्टाफ रूम मध्ये कोंडून स्टीलच्या पाईपने व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. जीव घेण्याची धमकी दिली. सोनी यांची स्कुटी, कार, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, 11 ग्रॅम सोन्याची साखळी व 18 हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 85 हजार किमतीचा मुद्देमाल हिसकावून घेतला.

 

सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुनील ब्रिजलाल चौधरी, पूजा सुनील चौधरी,  संजय ब्रिजलाल चौधरी (तिघे रा. तळोदा) निलेश आणि वीरजी (दोघांची पूर्ण नावे नाहीत) व त्यांचा एक अनोळखी साथीदार यांच्या विरोधात नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!