क्राईम ब्लास्ट ब्यूरो
गतिमंद मायलेकीच्या घरात ये-जा असल्याचा गैरफायदा घेऊन युवकाने मुलीवर अनेकदा बलात्कार केला. या प्रकारातून मुलगी गरोदर राहिली. हा संतापजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर संशयित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पाचोरा तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. पोळ्याच्या सुमारास मायलेकी आजारी असल्याने शेजारी दोघांना दवाखान्यात घेऊन गेले होते. तेथे तपासणीत 23 वर्षीय गतिमंद मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न होताच गावात खळबळ माजली. तिच्या दुरावस्थेस जबाबदार नराधमाचा शोध सुरू झाला.
तपासादरम्यान गावातील संशयित ज्योतिराम पाटील नामक 25 वर्षीय युवक मायलेकीच्या घरी वारंवार येत असल्याची माहिती मिळाली. त्याच्याबाबत विचारणा केली असता पीडित युवतीने हाताच्या खाणाखुणा करून तो चार पाचदा येऊन गेल्याचे सांगितले. रात्री बेरात्री घरात येऊन पीडितेची आई गाढ झोपेत असल्याची संधी साधून त्याने युवतीवर अत्याचार केल्याचा संशय आहे. त्याच्याविरोधात फिर्याद देण्यात आली.