क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर तालुक्यातील नांदर्डे गावाजवळ मजुरांनी भरलेली मार्शल जीप सात सप्टेंबरला सकाळी उलटून झालेल्या अपघातात 20 पेक्षा अधिक जण जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुडकी गावाकडून मजूर घेऊन सदर मार्शल जीप निघाली होती. नांदर्डे गावाजवळ आल्यानंतर चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या पलीकडे जाऊन जीप उलटली. अपघातातील मजुरांच्या किंकाळ्या ऐकून ग्रामस्थ धावून गेले. त्यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. उपजिल्हा रुग्णालयात सूचित केल्यानंतर तेथील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी मजुरांची रुग्णालयात वाहतूक केली. या घटनेत 20 पेक्षा अधिक मजूर जखमी झाल्याचा अंदाज आहे. नांदर्डे परिसर अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जात असून यापूर्वीही तेथे अपघात होऊन जीवित हानी झाली आहे. पोलिसांनी अनियंत्रित संख्येने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.