क्राईम ब्लास्ट ब्यूरो
उताऱ्यावर कुळाचे नाव नोंदवण्यासाठी आठशे रुपयांची लाच स्वीकारताना होळनांथे येथील तलाठी डी.जे.बोरसे याला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह पकडले.
23 ऑगस्टला सकाळी ही कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ माजली आहे.
यासंदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याच्या उताऱ्यावर कुळाची नोंदणी करून घेण्यासाठी तलाठी डी.जे.बोरसे यांनी आठशे रुपयांची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी धुळे येथे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विभागाच्या पथकाने 23 ऑगस्टला सकाळी सापळा रचला. त्यात तलाठी डी.जे. बोरसे आठशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला. त्याला थाळनेर पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे