हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

भाचीने केला मामीचा छळ

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

मामाशी संगनमत करून मामीचा छळ केल्याच्या संशयावरून भाचीसह सहा जणांविरोधात नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिंदखेडा तालुक्यातील वारूळ येथील माहेर असलेल्या 28 वर्षीय विवाहितेने पोलिसात फिर्याद दिली. तिचा विवाह 2018 मध्ये शहादा तालुक्यातील वैजाली येथील रहिवासी जितेंद्र शिवाजी पाटील यांच्यासोबत झाला. जितेंद्रची भाची धनश्री बाळू पाटील ही देखील मामाच्या घरी राहते. लग्नाला पंधरा दिवस उलटल्यानंतर ते जून 2022 पर्यंत संशयित जितेंद्र, धनश्री व त्याच्या नातेवाईकांनी त्याला बुलेट मोटारसायकल विकत घेऊन देण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये अशी मागणी पिडीतेकडे केली. मात्र पैशांची पूर्तता न होऊ शकल्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला.

संशयित पती जितेंद्र पाटील, सासू कोकिळा पाटील, सासरा शिवाजी दौलत पाटील, भाची धनश्री पाटील (सर्व रा. वैजाली), ननंद कविता बाळू पाटील, नंदोई बाळू गजमल पाटील (दोघे रा.सुरत, गुजरात) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक सचिन वाघ तपास करीत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!