क्राईम ब्लास्ट ब्यूरो
अधिकृत वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या मुन्नाभाई एमबीबीएसला पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित बनावट डॉक्टर पंकज भास्कर भामरे हा शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी गावचा रहिवासी आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील अवधान येथे कोतकर कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर संशयित बनावट डॉक्टर पंकज भामरे हा दवाखाना थाटून रुग्णांची तपासणी व उपचार करीत असल्याची गोपनीय माहिती वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यावरून आर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आसिफ कच्छी यांनी सहकाऱ्यांसह 19 ऑगस्टला दुपारी सव्वाबाराला भामरे यांच्या दवाखान्यावर छापा टाकला. त्यात संशयित वैद्यकीय पदवी किंवा प्रमाणपत्र नसतानाही ऍलोपॅथी वैद्यकीय उपचार पद्धतीचा वापर करून औषधे देत असल्याचे निष्पन्न झाले. संशयिताविरोधात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.