क्राईम ब्लास्ट ब्यूरो
पत्नीने तपकीर देण्यास नकार दिल्याच्या क्षुल्लक कारणावरुन तिच्यावर कुर्हाडीने वार करुन निघृण खून केल्याची घटना तालुक्यातील नटवाडे गावात घडली. संशयित पतीला शिरपूर शहर पोलिसांनी तातडीने अटक केली.
गीताबाई रामलाल पावरा असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 18 ऑगस्टला सायंकाळी आठच्या सुमारास तिचा पती रामलाल हजार्या पावरा याने पत्नीकडे तपकीर मागितली. तिने नकार दिला. त्याचा राग आल्याने संशयित रामलालने तिच्या डोक्यात कुर्हाडीने वार केला. वर्मी घाव लागल्याने ती जागीच मरण पावली. ग्रामस्थांनी तिला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. संशयित रामलाल हजार्या पावरा याला पोलिसांनी अटक केली. मृत गीताबाईचे माहेर उमर्दा गावाजवळ प्रधानदेवी पाड्याचे आहे. तिचे वडील गुलसिंह बाबा पावरा यांनी पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.