क्राईम ब्लास्ट ब्यूरो
हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या बांगलादेशातील युवतींना पोलिसांनी 18 ऑगस्टला छापा टाकून अटक केली.
या घटनेमुळे मुंबईत राहून देहविक्री करणाऱ्या सेक्स रॅकेटची पाळेमुळे शहरापर्यंत पोहोचल्याचे दिसून आले आहे. जळगाव शहरातील अजिंठा रोडवरील एका हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सुनील पाटील, गणेश देशमुख, रवींद्र मोतीराया, किरण धनके, निलेश पाटील, महेश महाले, निनल साखळीकर, अभिलाषा मनोरे, जुबेर तडवी, सलीम तडवी, समाधान पाटील यांच्यासह आरसीपी प्लॅटून, जिल्हा पेठ व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला.
पोलिसांना पाहून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पळ काढला. मात्र तेथील सफाई कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी खोल्यांची झडती सुरू केली. त्यात भरत सोनवणे, समरूद्दीन शेख यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासोबत चार मुली आढळल्या. त्यांच्याकडे असलेल्या ओळखपत्रात बिहारसह मुंबई येथील पत्ता नोंदवलेला आहे. मात्र प्राथमिक चौकशीत त्या बांगलादेशी असल्याचे आढळले. हॉटेल मालक सागर सोनवणे, सपना पाटील व श्याम नामक व्यक्ती विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.