हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

कुलूप न तोडताच केली घरफोडी !

कुलूप न तोडताच केली घरफोडी !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर शहरातील दाट लोकवस्तीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरवाडे येथे अलगद कुलूप उघडून घरफोडी करून संशयितांनी सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला. चोरट्यांनी घरातील खाद्यपदार्थही खाऊन टाकल्याचे आढळले.

 

 या घरफोडीमुळे परिसरात घबराट पसरली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करून संशयितांना अटक करावी अशी मागणी केली जात आहे. रेखाबाई सुरेश धनगर यांच्या घरात हा प्रकार घडला. त्या 9 ऑगस्ट पासून पुणे येथे राहणाऱ्या बहिणीकडे भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या मुलीचा मुलगाही त्यांच्याजवळ शिकत असून सुट्टीनिमित्त तोही घरी गेला होता. त्यामुळे घर कुलूपबंद होते. ही संधी साधून अज्ञात संशयितांनी डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने कुलूप उघडले व घरातील चीज वस्तू लंपास केल्या. सुट्टी संपवून रेखाबाईंचा नातू घरी आल्यावर त्याच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने रेखाबाईंचे पुतणे तथा मिलिंद हॉटेलचे संचालक बिपिन तेले यांना माहिती दिली. त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घरफोडीबाबत सुचित केले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

या घरफोडीत 5 ग्रॅम चांदीचे पैंजण, 5 ग्रॅम सोन्याचे घुंगरू, एक ग्रॅम ओम पान, लक्ष्मीपूजनाचे 5 शिक्के, अडीच भार चांदीची साखळी, एक हजार रुपयांची सुटी नाणी, दोन मनगटी घड्याळे, एक ग्रॅम सोन्याचे मणी, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व साडेसात ग्रॅम सोन्याची चेन असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. अत्यंत दाट लोकवस्ती व वर्दळ असलेला वरवाडे परिसर सुरक्षित मानला जातो. मात्र चोरट्यांनी तेथे हातसफाई दाखविल्याने पोलिसांनी अधिक गंभीरपणे तपास करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!