हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

दहिवदजवळ महिलेचा खून

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर तालुक्यातील दहिवद गावाजवळ कुऱ्हाडीने घाव घालून महिलेचा निघृण खून केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली आहे.

दहिवद गावामागे डी.आर.कॉटन फॅक्टरीजवळ असलेल्या शेतात 14 ऑगस्टला सकाळी सुमारे 22 वर्षीय महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी थाळनेर पोलीस ठाण्याला माहिती दिली. थाळनेरचे सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे व सहकारी पंचनाम्यासाठी तातडीने दाखल झाले. पंचनाम्याचे काम सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार सदर शेत डांगरी येथील रहिवासी जयवंत पाटील यांच्या मालकीचे असून त्यांच्या शेतात पंधरा दिवसांपूर्वीच  रखवालदारीच्या कामासाठी जोडपे आले होते. त्या जोडप्यातील महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. उभयतांना साडेतीन वर्षाचा मुलगा आहे. प्रथमदर्शनी माहितीनुसार, घरगुती वादातूनच पतीने पत्नीवर कुऱ्हाडीचे वार केल्याचे कळते. खून केल्यानंतर संशयित पती घटनास्थळीच बसून राहिला.  पंचनामा केल्यानंतर अधिक माहिती उपलब्ध होईल असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!