क्राईम ब्लास्ट ब्यूरो
मुलीस पळवून नेणाऱ्या युवकाच्या आजोबाला बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील होऱ्यापाणी गावात घडली.
जगन ओंकार धानका (वय 65, रा.होऱ्यापाणी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. त्यांच्या नातूने आपल्या मुलीस पळवून नेले असा संशय घेऊन संशयित खजान जिऱ्या धानका व ईश्वर खजान धानका या दोघांनी 12 ऑगस्टला दुपारी बाराच्या सुमारास जगन धानका यांना लाकडी काठ्यांनी डोक्यावर, मानेवर, पाठीवर, पायावर बेदम मारहाण केली. शिवीगाळ करून हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. दोन्ही संशयितांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार पाठक तपास करीत आहेत.