हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपुरात अवतरले महापुरुष

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त व क्रांती दिनाचे औचित्य साधून येथील आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलातर्फे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध सजीव देखावे आणि झाकी यांचा समावेश असलेल्या मिरवणुकीने शिरपूरकर नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

 

शहरातील पाताळेश्वर मंदिराजवळ  हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारकावर प्रांताधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार आबा महाजन, माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहून शहिदांना मानवंदना दिली. त्यानंतर पटेल संकुलातील विविध शाळांचा समावेश असलेल्या मिरवणुकीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली.

 

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, महात्मा फुले, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, सरदार पटेल, बिरसा मुंडा, खाज्या नाईक  यांच्यासह देशभरातील विविध महापुरुषांचे वेशभूषा केलेले विद्यार्थी, शोभिवंत घोडे, सजवलेले रथ यांचा समावेश मिरवणुकीत होता.

 

महाराष्ट्रातील लेझीम, गुजराथचा गरबा, बिहारची छट पूजा यासह पश्चिम बंगाल आदी राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण नृत्य आणि लोकसंस्कृतीची झाकी सादर करण्यात आली. ती पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. शहरातील प्रमुख मार्गावरून गेल्यावर आर.सी.पटेल संकुलाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये मिरवणुकीचा समारोप झाला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!