हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

नागेश्वर महादेवाची ही स्तुती नक्की ऐका !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूरच्या हरहुन्नरी कलावंतांनी एकत्र येऊन श्री क्षेत्र नागेश्वर येथे शूटिंग करून तयार केलेल्या नागेश्वरा या महादेवाच्या स्तुतीपर गीताचे  माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते थाटात प्रदर्शन करण्यात आले.

आर. सी. पटेल मेन बिल्डिंग मधील राजगोपाल भंडारी हॉलमध्ये हा कार्यक्रम नुकताच झाला. नागेश्वर सेवा संस्थानचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते किशोर रणदिवे यू ट्यूब चॅनेलनिर्मित तसेच सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक प्रशांत बागुल यांची प्रमुख भूमिका असलेल्या नागेश्वरा गीताचे लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी शिरपूर एजुकेशन सोसायटीचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, अविनाश पाटील, दर्यावसिंग जाधव, प्रकाश चौधरी, राजेश भंडारी, श्यामकांत ईशी, संजय चौधरी, गोकुळसिंग राजपूत, संतोष चौधरी, राजेंद्र चौधरी, प्राचार्य पी. व्ही. पाटील, प्राचार्य आर. बी. पाटील, मुख्याध्यापक सी. डी. पाटील, मुख्याध्यापक मनोज पाटील, पर्यवेक्षक एन. ई. चौधरी, पर्यवेक्षक जे. पी. पाटील, प्रेमसिंग राजपूत, संतोष जाधव, महेश चौधरी, आशिष चौधरी, युवराज चौधरी, प्रशांत बागुल, किशोर रणदिवे, विनोद पाटील, राजेंद्र पाटील, संजय जगताप आदी उपस्थित होते.

श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे या अभिनव उपक्रमासाठीसहकार्य लाभले.

श्री क्षेत्र नागेश्वर महादेव, अजनाड बंगला परिसराचे संपूर्ण चित्रीकरण करून सर्वत्र हे गीत प्रसारित होत आहे. त्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. कलाकार प्रशांत बागुल, निर्माता दिग्दर्शक किशोर रणदिवे, चित्रीकरण योगेश भोई मंथन मुव्हिज शिरपूर, गायक ध्वनी मुद्रण मंगेश सैंदाणे धुळे, सहकार्य संजय चौधरी, पंकज बागुल, रोहित बागुल, हितेश ईशी, नरेंद्र रायसिंग, सागर वाघ तसेच श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थानचे या गीतासाठी विशेष योगदान मिळाले.

माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण यांनी नागेश्वरा या गीताच्या निर्मिती बद्दल सर्व टीमचे कौतुक केले. तसेच श्रीक्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान खानदेशासह महाराष्ट्रात, गुजरात, मध्य प्रदेश व इतरत्र अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या योगदानामुळे व त्यांनी अतिशय सुंदर रित्या निसर्गरम्य पर्यटन स्थळ निर्माण केल्याबद्दल सर्वांच्या वतीने अभिनंदन केले. प्रास्ताविक संजय चौधरी यांनी केले.

 

इथे पहा व्हिडीओ

https://youtu.be/EtIlBY-9sdY

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!