हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

20 हजारांची लाच घेताना हवालदार व पंटरला पकडले

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

चोरीस गेलेली ऍक्टिव्हा स्कुटर मालकाला परत देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेतांना हवालदार आणि त्याच्या पंटरला अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

तक्रारदार हे धुळे येथील रहिवाशी असुन त्यांचे भावाचे लग्न असल्याने त्यांनी त्याचे मित्राकडुन ऍक्टीव्हा दुचाकी वाहन लग्न पत्रिका वाटण्यासाठी सुमारे एक महिन्यापुर्वी आणली होती. दुचाकी वाहन त्यांनी घरासमोर उभे करून ठेवले असता त्याचे ओळखीच्या दोन मुलानी दहा मिनिटाकरीता कामासाठी वाहन घेवुन जातो असे सांगुन तक्रारदार याचे भावाकडुन अॅक्टीव्हा घेवुन गेले होते. त्यांनतर सदर मुलांना दुचाकीसह पोलीस नाईक संजय जाधव नेमणुक सोनगीर पोस्ट यांनी सोनगीर पोलीस स्टेशन हदीत त्यांना रस्त्यावर अडवुन त्यांचेजवळुन दारुच्या बाटल्याचे बुच मिळुन आल्याने त्यांनी दुचाकी वाहन सोनगीर पोस्ट येथे जमा करुन घेवुन त्या मुलांना सोडुन दिले होते

त्यांनंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी सोनगीर पोलीसस्टेशन येथे जावुन पोलीस नाईक संजय जाधव यांची भेट घेतली असता त्यांनी त्यांचे पोलीस स्टेशन येथे जमा असलेले अॅक्टीव्हा दुचाकी वाहन सोडविण्यासाठी ७५,०००/ रुपये लाचेची मागणी करुन पैसे दिले नाही तर तकारदार यांच्या भावा विरुध्द गुन्हा दाखल होईल असे सांगितले होते.

तक्रारदार यांना पोलीस नाईक संजय जाधव यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात समक्ष येवुन दिनांक ०३/०८/२०२२ रोजी तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची दि. ०४/०८/२०२२ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान पोलीस नाईक संजय जाधव यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती २०,०००/- रू पंचासमक्ष मागणी करून सदर लाचेची रक्कम त्यांनी त्यांचे खाजगी पंटर ज्ञानेश्वर कोळी रा. देवभाने ता. जि. धुळे यांचे हस्ते देवभाने येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे समोरील रस्त्यालगत स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन यांचे विरूध्द सोनगीर पोस्टे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश झोडगे तसेच राजन कदम, शरद काटके, कैलास जोहरे, भुषण खलाणेकर, संतोष पावरा, भुषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, रोहीणी पवार, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, वनश्री बोरसे यांनी केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. नारायण न्याहाळदे व वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री. सतिष भामरे यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!