क्राइम ब्लास्ट ब्यूरो
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर निष्काळजीपणे ट्रॅक्टर उभे केल्याने कार त्याला धडकली. त्यामुळे अपघात होऊन पाचजण ठार तर दोनजण गंभीर जखमी झाले. अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रॅक्टरचा चालकही अपघातात ठार झाला. त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

एक ऑगस्टला दुपारी साडेचारला गव्हाणे फाट्याजवळ फर्ग्युसन ट्रॅक्टरला ह्युंदाई व्हर्ना कार धडकून अपघात झाला होता. त्यात शिरपूरकडून नाशिककडे जाणारे संदीप शिवाजी चव्हाण, मीना संदीप चव्हाण, जान्हवी तथा परी संदीप चव्हाण (तिघे रा.उत्तम नगर, नाशिक), हितेश अरुण चौधरी (रा.म्हसरुळ, नाशिक) व पांडूरंग धना माळी (रा.सोनगीर) हे ठार झाले होते. टॅ्रक्टर महामार्गाची डागडुजी करण्यासाठी आणले असून ते निष्काळजीपणे रस्त्यात उभे केल्याने अपघात झाल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी मृत ट्रॅक्टरचालक पांडूरंग माळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
