हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

पत्नीची आत्महत्या, नायब तहसीलदारावर गुन्हा

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून नायब तहसीलदार गोपाल साहेबराव पाटील यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

धुळे शहरातील देवपूरमधील शिवनेरी कॉलनीत प्लॉट नंबर 12 मध्ये राहत्या घरात 27 जुलैला सकाळी चित्रलेखा गोपाल पाटील (वय 36) यांनी आत्महत्या केली. घराच्या किचनमध्ये ओढणीने गळफास लावून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

चित्रलेखा पाटील यांचे वडील लोटन पांडुरंग थोरात धुळे येथे देवपूरच्या वीटभट्टी परिसरात राहतात. त्यांनी देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांचे जावई तथा साक्री तहसील कार्यालयात नायब तहसीलदार असलेले गोपाल पाटील पत्नी चित्रलेखा हिचा चारित्र्यावर संशय घेऊन छळ करीत होते. त्याला कंटाळून तिने आत्महत्या केली. गोपाल पाटील यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पाटील दाम्पत्याला दोन मुले आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!