हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

लाचखोर किरण मोरेला रंगेहाथ पकडले

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिंदखेडा पंचायत समितीचा ग्रामपंचायत विभागाचा कनिष्ठ सहायक किरण मोरे याला धुळे येथील दत्त मंदीर चौकात सहा हजार रुपयांची लाच घेताना 19 जुलैला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात किरण मोरे याने लाच स्विकारली होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पंचायत समिती, शिंदखेडा अंतर्गत वाघाडी खुर्द येथे ग्रामसेवक या पदावर कार्यरत होते. तेथुन पदोन्तीने त्यांची ग्रामविकास अधिकारी या पदावर पंचायत समिती, शिरपुर येथे बदली झाली असल्याने त्यांना दि.१८/०४/२०२२ रोजी कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर ते वेळोवेळी त्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र मिळणे कामी शिंदखेडा पं समिती येथील कनिष्ठ सहायक श्री. किरण मोरे यांची भेट घेत होते. तेव्हा कनिष्ठ सहायक किरण मोरे यांनी तक्रारदार यांचे कडे ८,०००/- रू लाचेची मागणी केली असुन त्यांनी तक्रारदार यांना गटविकास अधिकारी, श्री. देवरे यांनी अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी समक्ष बोलविले असुन त्यांचेशी सदर विषयावर चर्चा करून तक्रारदार यांना अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यात येईल असे सांगितले असल्याची माहिती तक्रारदार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दुरध्वनी द्वारे दिली होती.

सदर माहितीवरून धुळे अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने शिंदखेडा येथे जाऊन तक्रारदार यांची भेट घेऊन त्यांची तक्रार नोंदवुन सदर तक्रारीची दि. १८/०७/२०२२ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान कनिष्ठ सहायक किरण मोरे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे वेतन अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी गटविकास अधिकारी श्री. देवरे यांच्यासाठी ४,०००/- रू व स्वत:साठी २,०००/ रूपये अशी एकुण तडजोडी अंती ६,०००/-रू पंचासमक्ष मागणी करून सदर लाचेची रक्कम त्यांना धुळे येथे देण्याचे सांगितले होते. कनिष्ठ सहायक किरण मोरे यांनी तक्रारदार यांना आज दि. १९/०७/२०२२ रोजी धुळे येथे दत्त मंदिर चौकात पैसे घेवुन अंतिम वेतन प्रमाणपत्र घेण्यासाठी ०८:४५ वा. बोलविले होते. त्याप्रमाणे आज दि.१९/०७/२०२२ रोजी धुळे दत्त मंदिर चौकातील एच.डी.एफ.सी बँके जवळ सापळा लावला असता कनिष्ठ सहायक किरण मोरे यांनी तक्रारदार यांच्या कडुन ६,०००/- रुपये लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले असुन यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री. अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश झोडगे तसेच राजन कदम, शरद काटके, कैलास जोहरे, भुषण खलाणेकर, संतोष पावरा, भुषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, वनश्री बोरसे, रोहीणी पवार यांनी केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. श्री. सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. नारायण न्याहाळदे व वाचक पोलीस अधीक्षक मा. श्री. सतिष भामरे यांच्या मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!