क्राईम ब्लास्ट ब्यूरो
प्रेम विवाह करून तिला घरात आणले, चार मुलेही जन्माला घातली आणि क्षुल्लक कारणावरून तिचा खून केला. हैवान झालेल्या पतीला पोलिसांनी अटक केली.
निर्मला गणेश चव्हाण (वय 35, रा.लखाळे पोस्ट वार्सा ता.साक्री) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. 12 जुलैला रात्री साडेआठला गणेश चव्हाण याने लाकडी दांडक्याने तिचे तोंड व डोके ठेचून खून केला.
गणेश आणि निर्मलाचा प्रेमविवाह झाला होता. दोघांना चार मुले आहेत. गणेश मूळचा ताहाराबाद (ता.सटाणा) येथील रहिवाशी असून सध्या लखाळे येथे निर्मलासोबत राहत होता. 12 जुलैला रात्री निर्मला हिने जेवण तयार केले नाही या कारणावरून त्याचा पत्नीशी वाद झाला. संतापाच्या भरात त्याने लाकडी दांडके हातात घेऊन निर्मलावर वार केले. या मारहाणीत ती ठार झाली. फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या गणेशला पिंपळनेरचे एपीआय सचिन साळुंखे यांनी अटक केली. त्याच्याविरोधात सुरमल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.