क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर शहरातील रामसिंग नगर येथील 24 वर्षीय युवकाने 13 जुलैला रात्री अकराच्या सुमारास डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हर्षल भिका माळी असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचे वडील भिका माळी रामसिंग नगरमध्ये किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह भागवतात. रात्री अकराला रामसिंग नगर गोळीबाराच्या आवाजाने दणाणले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता हर्षल माळी याच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव सुरू असल्याचे आढळले. त्याच्याजवळ गावठी बनावटीचे पिस्तूलही पडले होते. त्याने पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.