हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

काय तो ट्रक, काय ती दारू, गुजरातमध्ये ओक्के हाय समद !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यात दारू वाहून नेणाराट्रक पोलिसांनी एक जुलैला जप्त केला. या कारवाईत एकूण 43 लाख 77 हजार 120 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना साक्रीकडून गुजरात राज्यात मद्य तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, हवालदार दादाभाई मासूळ, जितेंद्र ठाकूर, जितेंद्र तोरवणे, तुषार पाटील, राजेंद्र काटके, आनंदा मराठे यांनी विसरवाडीकडून जाणाऱ्या नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ॲपल हॉटेलजवळ सापळा रचला. संशयित अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (जीजे 06 एझेड 3560) साक्रीकडून येत असताना त्याला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. पोलिसांना पाहून काही अंतरावर ट्रक उभा करून संशयित पळून गेला. पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता रॉयल क्लासिक व्हिस्कीची 60 खोकी, रॉयल ब्ल्यू व्हिस्कीची 518 खोकी आढळली. ट्रकसह मुद्देमालाची एकूण किंमत 43 लाख 77 हजार 120 रुपये आहे. प्रथमदर्शनी चौकशीत ट्रकदेखील चोरीचा असल्याचे आढळले. अज्ञात संशयता विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कारवाई करणाऱ्या पोलिसांचे अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अभिनंदन केले. मद्यसाठ्याच्या मूळ मालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!