हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूरचे आमदार कोणावर आहेत नाराज ?

 
क्राईम ब्लास्ट ब्यूरो 
 
आदिवासी वन अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना वायदा करूनही प्रशासन अनुसूची जे म्हणजे वन सातबारा देत नसल्यामुळे शिरपूरचे आमदार नाराज झाले असून त्यांनी जाहीर पत्रकाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. 
 
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची 1 जुलै 2022 रोजी जयंती निमित्त सर्वत्र कृषी दिन म्हणून जिल्हाधिकारी तसेच विविध खात्याप्रमुखांनी दौरे काढून प्रबोधनपर व्याख्याने, कृतीयुक्त सहभाग असलेली प्रात्यक्षिके दाखवून साजरा केला जात असताना वन हक्क कायद्याबाबत मात्र प्रशासनाने पूर्णतः अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. या कृषी दिनी शेतकरी, शेतमजूर तसेच आदिवासी शेतकरी पूर्णतः उपेक्षित राहिला आहे.
 
ज्या पारंपारिक आदिवासी बांधवाला शेतकरी म्हणून दर्जा मिळावा यासाठी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी जनज शर्मा यांची भेट घेऊन अनेक मागण्यांचे निवेदन दिले होते. त्यांनी आश्वासन दिले होते की, 30 जून 2022 पर्यंत आदिवासी बांधवांना ‘अनुसूची-जे’ (वन सातबारा उतारा) देण्यात येईल. परंतु, आजपर्यंत तशी प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक श्री पगारे यांच्या मार्फत माहिती मागविली असता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार लोकप्रतिनिधी, आमदार यांच्या हस्ते ‘अनुसूची-जे’ चे वाटप केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी यांच्या हक्कासाठी वन हक्क कायदा संसदेत सन 2006 मध्ये मंजूर करण्यात आला असून त्याचे पालकत्व राज्यपाल महोदय यांच्याकडे असून देखील कोणत्याही प्रकारची मदत वेळेवर होताना दिसून येत नाही. इतर जिल्ह्यात ‘अनुसूची-जे’ चे वाटप होऊन त्या वन सातबारावर पीकपेराची नोंदी लावण्यात आले आहेत.
 
शिरपूर तालुक्यातील वनविभागाने वन सातबारे, वन हक्क धारकाकडे मुदतीत पोहच करावे. पेरणीचा खरिपाचा हंगामा सुरू झाला असून कमीत कमी इतके तरी पुण्याचे काम संबंधित महसूल व वन अधिकाऱ्यांकडून व्हावे अशी आदिवासी समाजाने अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रशासनाने आदिवासी समाजाचा अपेक्षाभंग करू नये असे आमदार काशिराम पावरा यांनी पत्रकात म्हटले आहे.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!