हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तहसीलदारांची माणुसकी, घरी जाऊन दिला मदतीचा धनादेश

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

एकीकडे गरजूंशी उर्मटपणे वागणार्‍या अधिकार्‍यांचा सुळसुळाट झाला असतांना शिरपूरच्या तहसीलदारांनी मात्र सर्वांनाच सुखद आश्चर्याचा धक्का देत मृताच्या कुटुंबाकडे थेट शेतात जाऊन मदतीचा धनादेश दिला. त्यांच्या या कृतीचे जनतेतून कौतुक करण्यात येत आहे.

शिरपूर तालुक्यातील भोईटी येथील हनुमानपाड्यातील शेतकरी भंगी भुरल्या पावरा या 35 वर्षीय शेतकर्‍याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने त्यातून कसे सावरावे असा प्रश्न पावरा यांच्या कुटुंबापुढे उभा राहिला. तहसीलदार आबा महाजन यांनी परिस्थिती समजून घेत भंगी पावरा याच्या मृत्यूबाबत अहवाल तयार करुन घेत शासनाकडे सादर केला. त्यामुळे पावरा यांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तेव्हढ्यावरच न थांबता तहसीलदार आबा महाजन यांनी धनादेश सोबत घेऊन थेट हनुमानपाडा गाठले. तेथील शेतात मृत भंगी पावरा यांच्या पत्नी निर्मलाबाई यांना चार लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सरपंच दीपक पावरा, पोलिस पाटील दगडू ढिवरे, तलाठी अनिरुद्ध बेहळे, कोतवाल भिमसिंह भिल व ग्रामस्थ उपस्थित होते. तहसीलदारांच्या या माणुसकीचे परिसरातून कौतुक करण्यात आले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!