क्राईम ब्लास्ट ब्यूरो
धावत्या मोटारसायकलवर मागे बसलेल्या पत्नीने पतीच्या गळ्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे अवघ्या तीन महिन्यापूर्वीच दोघांचा विवाह झाला आहे.
योगेश बापू बाचकर (वय 21) असे जखमी पतीचेनाव आहे. तो साक्री तालुक्यात निजामपूर गावाजवळ गोकुळ नगरीत राहतो. तीन महिन्यापूर्वी त्याचा विवाह साक्री तालुक्यातील पंढरपूर गावातील कविता हिच्याशी झाला. ती काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. तिला घेण्यासाठी योगेश मोटारसायकलीवर गेला. दोघेही परत येत असताना कविताने बॅगेमधील चाकू काढत अचानक योगेशच्या गळ्यावर वार केला. त्यामुळे मोटारसायकल स्लिप होऊन दोघेही खाली पडून जखमी झाले. योगेशच्या फिर्यादीवरून पत्नी कविता हिच्याविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.