क्राईम ब्लास्ट ब्यूरो
घरगुती भांडण टोकाला जाऊन संतप्त पतीने चाकूने पत्नीचा गळा चिरुन खून केल्याची धक्कादायक घटना नंदुरबार येथे घडली. संशयित पतीला अटक करण्यात आली आहे.
22 जूनला सकाळी साडेदहापूर्वी नंदुरबार शहरातील तुलसी विहार कॉलनीत प्लॉट नं.22 मध्ये वरच्या मजल्यावर ही घटना घडली. अरुण सुकलाल नामदास (वय 36) व त्याची पत्नी रेखा (वय 28) तेथे राहत होते. दोघांमध्ये घरगुती कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात त्याने पत्नीचा चाकूने गळा चिरून खून केला. अशोक देवराम खांडेकर याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक दिनेश भदाणे तपास करीत आहेत.