हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

…म्हणून घेतला मनिषाने गळफास !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

 

लग्न होऊन महिनादेखील उलटला नाही तोच विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शिरपूर तालुक्यातील दोंदवाडीपाडा येथे घडली होती. तिच्या माहेरील लोकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले आहे.

मनिषा तोताराम पावरा या 26 वर्षीय विवाहितेने 16 जूनला सायंकाळी दोंदवाडीपाडा येथे सासरी गळफास लावून आत्महत्या केली होती. तिचे माहेर न्यू बोराडी येथील आहे. नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या मनिषाचा विवाह 22 मेस झाला होता. लग्नाला महिना उलटण्याच्या आतच तिला जगणे असह्य का वाटू लागले याबाबत चर्चा सुरू होती.

सुदाम काना पावरा (रा.न्यू बोराडी) यांनी 20 जूनला सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या घटनेचे गूढ उलगडले. लग्नानंतर मनिषाने शेतात कामाला जावे अशी तिच्या सासरच्या लोकांची अपेक्षा होती. मात्र तिला नोकरी करावयाची असल्याने तिने नकार दिला. या कारणावरून तिचा पती दारू पिऊन तिला मारहाण करीत होता तर घरातील इतर लोक टोमणे मारून मानसिक त्रास देत होते. 27 जूनपासून हा छळ सुरू होता. अखेर त्रास असह्य होऊन तिने 16 जूनला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या फिर्यादीवरून पती तोताराम पावरा, सासरा मोतीराम पावरा, सासू शियानीबाई, दीर शांतीराम, दिराणी आशाबाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पीएसआय भिकाजी पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!