क्राईम ब्लास्ट ब्यूरो
लग्न लागल्यानंतर नवरी पसंत नाही म्हणणाऱ्या मुंबईच्या नवरदेवासोबत संपूर्ण वऱ्हाडाला बेदम झोडपल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
औरंगाबाद जिल्ह्यातील गांधेली येथील युवतीचा विवाह मुंबईच्या युवकाशी ठरला होता. ठरल्या दिवशी लक्झरी बसमधून वऱ्हाड आले. थाटात लग्न लागले. जेवणाच्या पंगती उठल्या. परत निघायची वेळ झाली नी नवरदेव म्हणाला…
मला मुलगी पसंत नाही, मी तिला घेऊन जाणार नाही !
झालं…मुलीकडचे चिडले. त्यांनी सरळ नवरदेवाला धू धू धुतला. त्याला वाचवण्यासाठी आलेले मित्र, नातेवाईक आणि वऱ्हाडी यांनाही बेदम झोडपण्यात आले. लग्नमंडपाचे रणांगणात रूपांतर झाले. तेव्हढ्यावर न थांबता त्यांनी वऱ्हाडाच्या गाड्याही फोडल्या. या हाणामारीत नवरीकडच्या दोन महिलांचीही डोकी फुटली.
इतका तमाशा पाहिल्यावर नवरीही पुढे झाली आणि म्हणाली…
असला नवरा नको गं बाई !
चिकलठाणा पोलिस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.