हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तीन तासांत सापडले 59 बेवडे !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो 
 
वेळ तीन तास…. 552 जणांची तपासणी आणि सापडले 59 बेवडे ! मनसोक्त दारू पिऊन इतरांच्या जीवाला अपाय होईल अशा पद्धतीने धोकादायक रित्या वाहन चालवणाऱ्यांना नंदुरबार पोलिसांनी ताब्यात घेतले. 
 
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.श्री.बी.जी.शेखर पाटील यांनी रस्ते अपघाताच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता बरेचशे गुन्हे हे वाहन चालकाच्या चुकीमुळे विशेषत: मद्यप्राशन करुन वाहन चालविल्यामुळे झाले असल्याचे आढळून आले. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.श्री.बी.जी.शेखर पाटील यांनी संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करणेबाबत संपूर्ण नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुध्द् दिनांक 18/06/2022 रोजी रात्रौ 08.00 वा. ते रात्रौ 11.00 वाजे दरम्यान विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक 18/06/2022 रोजी रात्रौ 08.00 वा. ते रात्रौ 11.00 वाजे दरम्यान दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द् राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत एकुण 20 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान एकुण 552 चारचाकी व दुचाकी मोटरसायकल चालकांची तपासणी केली असता, त्यात 59 वाहन चालकांनी मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यांचे विरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे-10, उपनगर पोलीस ठाणे येथे-04, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे-04, नवापुर पोलीस ठाणे येथे-11, विसरवाडी पोलीस ठाणे येथे-06, शहादा पोलीस ठाणे येथे-04, धडगांव पोलीस ठाणे येथे-03, म्हसावद, सारंगखेडा, अक्कलकुवा, तळोदा पोलीस ठाणे येथे प्रत्येकी 02 गुन्हे, मोलगी पोलीस ठाणे येथे-03, शहर वाहतुक शाखेमार्फत 06 गुन्हे असे एकुण 59 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले.

दिनांक 18/06/2022 रोजी रात्रौ 08.00 वा. ते रात्रौ 11.00 वाजे दरम्यान दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द् राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे  परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव मा.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात येणार असुन लवकरच त्यांचेवर परवाने (लायसन्स) निलंबनाची कारवाई करण्यात येईल व भविष्यात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.

नाकाबंदीसाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार श्री. सचिन हिरे, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्री. श्रीकांत घुमरे, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा श्री. संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांचेसह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व 15 दुय्यम अधिकारी तसेच 107 पोलीस अमंलदार यांनी सहभाग घेतला.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकादायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये. दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी दुचाकीस्वार व चारचाकी स्वार आढळुन आल्यास त्यांचेवर गुन्हे दाखल करुन परवाने (लायसन्स) निलंबित करणेची कारवाई भविष्यातही अशीच सुरु राहील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री. पी.आर.पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!